- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गढी सूपखार वन परीक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्प परिसरात शोध मोहीम करीत असलेल्या जवानावर नक्षलवाद्यांनी अचानक फायरिंग सुरू केली. हॉकफोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांना आत्मसर्मपण करण्याचे आवाहन केले. मात्र, नक्षलवाद्यांनी पोलिस जवानाच्या दिशेने सातत्याने फायरिंग सुरूच ठेवली.यानंतर हॉकफोर्स व पोलिसांनी याला प्रत्युत्तरात फायरिंग केली.चकमकीत चार नलक्षवादी ठार झाले.काही नक्षलवादी जखमी झाले,ते घनदाट जंगलाचा आधार घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये आशा कान्हा भोरमदेव (एरिया कमेटी कमांडर),शीला,रंजीता,लख्खे कान्हा भोरमदेव यांचा समावेश होता.या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.तीन महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे.चकमकीत ठार झालेल्या तीनही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून,त्यांच्यावर ६२ लाख रुपयांचे बक्षीस होते.मध्य प्रदेश,छत्तीसगड राज्यात त्यांच्यावर नक्षली कारवाईचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी काल गुरुवारी २० फेब्रुवारीला बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या चकमकीची माहिती देताना पोलिस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले की, गढी सूपखार वन परिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्पजवळ १९ फेब्रुवारी रोजी ही चकमक झाली.या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले.तर काही नक्षलवादी पळून गेले. या जंगलात हॉकफोर्स,पोलिस विभागाच्या १२ पथकातील जवळपास ५०० जवानांचा समावेश होता.
- Advertisement -

