उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्च ते १३ मार्च २०२३ या तीन दिवसात चंद्रपूर येथील मिराज सिनेमा,एम.डी.आर.मॉल येथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.आज ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. ‘पंचक’ या मराठी चित्रपटाने फिल्म फेस्टिवलचा आगाज होणार आहे. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इनस्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) चे माजी अधिष्ठाता समर नखाते उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक भाषेतील चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांची निर्मिती कशी होते.ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा,त्याची मांडणी या सर्व बाबींची ओळख होऊन आपल्या भुमीतही फिल्म साक्षरता निर्माण व्हावी; हा या फेस्टिवलचा प्रमुख उद्देश आहे. तीन दिवसात देशी चित्रपटांसोबतच विदेशी चित्रपटांचीसुध्दा पर्वणी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे.