- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आपण ज्याला न्याय मंदिर संबोधतो,अश्या न्याय मंदिरातील न्याय देणाराच खोटा सिक्का निघाला तर याला काय म्हणावे? घोर कलयुग आलाय,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.कित्तेक काळापासून न्यायालयाकडे सर्वसामान्य नागरिक न्याय हक्काचे मंदिर म्हणून पाहतो.मात्र,ज्यांच्यावर विश्वास ठेवतो,असे न्यायाधीशच आरोपीला सोडवण्यासाठी लाच घेत असतील तर सर्व सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयिताला जामीन देण्यासाठी मध्यस्थामार्फत ५ लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-३ चे धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे यांनी ही कारवाई केली आहे.घडलेल्या घटनेमुळे न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचे काम आरोपी न्यायाधीश निकम यांनी केले आहे.तसेच घटनेचे गांभीर्य पाहता न्यायालयाने देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
काय आहे प्रकरण👇
आनंद मोहन खरात रा.दहिवडी,ता.माण,किशोर संभाजी खरात रा.वरळी,मुंबई व न्यायाधीश धनंजय निकम रा.सांगली यांच्यासह एका अनोळखी युवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये सातारा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार २४ वर्षीय युवती पुणे येथील आहे.या युवतीने तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या वडिलांना सातारा शहर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे सध्या ते कारागृहात आहेत.वडिलांना जामीन मिळावा; यासाठी आपण सातारा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.याबाबतची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक- ३ चे न्यायाधीश धनंजय निकम यांच्यापुढे सुरू आहे.दिनांक-२९ नोव्हेंबर रोजी संशयित आनंद खरात (सुरुवातीला त्याने सम्राट जाधव असे नाव सांगितले) हा साताऱ्यातून आल्याचे सांगितले.तसेच तुमच्या वडिलांना अटक असलेल्या प्रकरणात जामिनासाठी मदत करणार आहे; असे सांगितले.
दिनांक-३० नोव्हेंबर रोजी संशयित आनंद खरात याने तक्रारदार युवतीच्या मोबाईलवर फोन करून वडिलांचा जामीन करायचा असेल तर ५ लाख रुपयांचा प्रोटोकॉल करावा लागेल,असे सांगितले. पैशाची मागणी झाल्याने आपण दिनांक-२ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे येथे तक्रार केली.पुणे ‘एसीबी’ने तक्रार घेतल्यानंतर दिनांक- ३ डिसेंबर रोजी मी खरात यास भेटले.पुणे ‘एसीबी’ने या तक्रारीची पडताळणी केली असता, आनंद खरात व किशोर खरात हे दोघे जामीन अर्जाची पुढील सुनावणी १० डिसेंबर असल्याचे सांगताना आढळले.तसेच न्यायाधीशांची कोर्टात भेट घालून देतो,त्यावेळी ‘एमएसईबी’ हा कोडवर्ड वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिनांक-९ डिसेंबर रोजी कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर न्यायाधीशांची भेट घालून देतो,असे खरात या संशयितांनी सांगितले. सायंकाळी आपण व ‘एसीबी’ पुणे येथील शासकीय पंच एकत्र असतांना एक कार (एम.एच.१६ बीएच ४४९९) आली.त्यामध्ये आनंद खरात व किशोर खरात होते.आपल्याला व पंचांना कारमध्ये बसण्यास सांगितले.चौघांची चर्चा सुरू असतांना आणखी एक कार (एम.एच.१० बीए ९४१४) आली.त्या कारमध्ये न्यायाधीश धनंजय निकम होते.यानंतर आनंद खरात यांच्यासह मी न्यायाधीशांच्या कारमध्ये बसले.तेथे ‘एमएसईबी’ या कोडवर्डवर ते दोघे बोलू लागले. प्राथमिक चर्चेनंतर न्यायाधीशांच्या कारमधून बाहेर पडलो.लाचेची रक्कम दिनांक-१० डिसेंबर रोजी घेणार असल्याचे स्पष्ट झाले.यामुळे पुणे ‘एसीबी’ विभागाने लाचेच्या रकमेवर अँथ्रासीन पावडर लावली. संशयिताचा फोन आल्यानंतर लाचेची रक्कम घेण्यासाठी साताऱ्यातील हॉटेलमध्ये बोलावले. हॉटेलचे लोकेशनही खरातला पाठवले.लाचेची रक्कम घेण्यासाठी दोन्ही खरातसह आणखी एक युवक आला.यावेळी आपल्याशी बोलत असतांना तिघा संशयितांना शंका आली.यामुळे त्यांनी हॉटेलमधून धूम ठोकली.
न्यायाधीश धनंजय निकम यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदार युवतीने त्यांच्या कारच्या क्रमांकाचाही उल्लेख केला आहे.संबंधित कार न्यायाधीश धनंजय निकम यांच्याच नावावर असल्याचे समोर आले असून ते मूळचे सांगलीचे आहेत.
- Advertisement -

