- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस टंचाई संदर्भात सुरू असलेल्या अफवा तसेच सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज,शुक्रवार १३ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये नागपूर विभागातील १६३ गॅस वितरकांची तसेच गॅस गोडाऊनची तपासणी करण्यात आली.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात ७० वितरकांची तपासणी करण्यात आली असून भंडारा जिल्ह्यात ३७,गोंदिया १७,नागपूर जिल्ह्यात १९,अन्न धान्य वितरण अधिकारी ३,वर्धा जिल्ह्यात १५,तर चंद्रपूर जिल्ह्यातील २ ठिकाणी आकस्मिक धाडी टाकण्यात आल्या.यामध्ये ११० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून,१ लाख ७ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यातच,धडक कारवाईमध्ये ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दोन,गोंदिया जिल्ह्यातील एक,तर नागपूर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.नागपूर विभागात गॅस सिलेंडरसह पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन विभागीय पुरवठा आयुक्त अनिल बन्सोड यांनी केले आहे.
- Advertisement -

