Thursday, August 13, 2026
Homeगोंदियाग्रामपंचायतीकडून 'रेस्टॉरंट' साठी घेतला ना हरकत प्रमाणपत्र अन् चक्क 'बार' च केला...

ग्रामपंचायतीकडून ‘रेस्टॉरंट’ साठी घेतला ना हरकत प्रमाणपत्र अन् चक्क ‘बार’ च केला सुरू…-कुरखेडा येथील तक्तानी यांनी नियम बसवले धाब्यावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी ग्रामपंचायतीकडून रेस्टॉरंट सुरू करण्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन चक्क त्याठिकाणी बार सुरू केला. विशेष म्हणजे या बारपासून ५० मीटर अंतरावर शाळा असून,उत्पादन शुल्क विभागाने बार सुरू करण्याचा परवाना दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यावरून आता गावातील वातावरण तापले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, केशोरी-कनेरी येथे प्रिया विष्णू तक्तानी (रा.कुरखेडा) यांना २७ जुलै २०२३ रोजी मासिक सभा ठराव ९/३ नुसार स्थानिक डॉ. राधाकृष्णन शाळेसमोरील इमारतीत रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी केशोरी ग्रामपंचायतीने दिली होती.मात्र त्या जागेवर प्रिया विष्णू तक्तानी यांच्याकडून बार व रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. याला शिक्षण संस्था व स्थानिकांनी विरोध केला व परवानगी रद्द करण्याची मागणी केली.त्या अनुषंगाने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या सभेत ठराव क्रमांक ९/१ नुसार ग्रामपंचायतीने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून परवानगीच नाकारली.तशी माहिती ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गोंदिया, पोलिस निरीक्षक केशोरी यांना दिली.तसेच नियमाला धाब्यावर बसवून सुरू केलेला बार व रेस्टॉरंट स्थलांतरित करण्याची मागणी केली.मात्र उत्पादन शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालय,स्थानिक गावकरी, परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या मागणीला झुगारून संबंधित संचालकांना बार व रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी दिली कशी? असा संतप्त सवाल आता गावकऱ्यांकडून केला जात आहे. यावरून गावातील वातावरण तापले आहे.विशेष म्हणजे डॉ.राधाकृष्णन हायस्कूल,राधाकृष्णन कॉन्व्हेंट आणि विदर्भ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,कनेरी-केशोरी यांची भिंत नव्याने सुरू झालेल्या प्रिया रेस्टॉरंट आणि बारला लागूनच आहे.त्याचप्रमाणे त्याच्या बाजूलाच सामूहिक पद्धतीने राहणारे कुटुंबसुद्धा त्रासलेले आहे.त्यामुळे या सर्व गोष्टींची चाचपणी न करताच उत्पादन शुल्क विभागाने शाळेशेजारी बार उघडण्याची परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नंदकुमार गहाणे,सरपंच, ग्रामपंचायत केशोरी👇

तक्तानी यांनी रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली.त्यावर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत चर्चा करून परवानगी दिली.मात्र, संचालकानी रेस्टॉरंटसह बार सुरु केल्याने स्थानिक ग्रामस्थांचा तसेच शैक्षणिक संस्थांचा विरोध झाल्यामुळे दिलेली परवानगी रद्द करण्यात आली. याबाबत संचालकांना यापूर्वीच कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!