Saturday, June 20, 2026
Homeनागपूरगोलमाल..! इतर विभागात चौकशीचे निर्देश असतांनाही बोर्डाचे अध्यक्षपद..

गोलमाल..! इतर विभागात चौकशीचे निर्देश असतांनाही बोर्डाचे अध्यक्षपद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शालार्थ आयडी घोटाळ्यातून नवनवीन कारनामे उजेडात येऊ लागली आहेत.त्यामुळे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभार स्वीकारण्यासाठी अधिकारी तयारच नसल्याचे वास्तव आहे.अश्यातच आता शासनाने अमरावतीचे शिक्षण उपसंचालक डॉ.शिवलिंग पटवे यांच्याकडे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाची धुरा सोपविली आहे.डॉ.शिवलिंग पटवे यांची नागपूर विभागीय मंडळाच्या अध्यक्ष पदावर चार महिन्यांपूर्वीच पदोन्नती झाली होती. मात्र,त्यांनी रुजू न होता या काळात रजा घेतली होती. सोमवारी त्यांनी विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.मात्र पटवे हे देखील विविध वादांत अडकले होते.त्यांच्या कार्यकाळात देखील बोगस शालार्थ आयडी तयार झाल्याचे आरोप झाले होते.विशेष म्हणजे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मंजूर झाला होता.त्यामुळे त्यांच्याकडे विभागीय मंडळाची धुरा सोपविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर,राज्य सरकारने राज्यभरातील शिक्षक नियुक्त्त्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.या चौकशीसाठी विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे,जे गैरप्रकारांचा शोध घेत आहे.या घोटाळ्यात,बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तपासाच्या चौकटीत आले आहेत.डॉ.पटवे यांच्यावरही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या अनियमिततेमुळे त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.सोबतच अमरावती विभागातील पे युनिट कार्यालयांच्या कार्यपद्धतीबाबतही चौकशीचे निर्देश आहेत.या चौकशीचे निर्देश आ.सुधाकर अडबाले यांनी दिले होते.पटवे २०१७ ते २०२० या कालावधीत नागपुरात होते.माहितीनुसार,डॉ.पटवे यांनी शालार्थ आयडीच्या बनावट दस्तऐवजांना मंजुरी दिल्याचा आरोप आहे.मात्र,त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की,संबंधित मंजुरी पत्रांवर असलेल्या स्वाक्षरी बनावट आहेत आणि नागपूरच्या एसएससी बोर्डाकडे अशा कोणत्याही पत्रांची नोंद नाही.तसेच,पोलिसांनी आधीच एका व्यक्तीला अटक केली आहे,ज्याने डॉ. पटवे यांची स्वाक्षरी बनावट केल्याचा आरोप आहे.अश्यातच आता डॉ.पटवेंच्या खांद्यावर बोर्डाची धुरा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!