Tuesday, August 18, 2026
Homeनागपूरगोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणले जाणार हिमालयीन काळे अस्वल आणि लाल रानकोंबड्या..

गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणले जाणार हिमालयीन काळे अस्वल आणि लाल रानकोंबड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वाघ आणि बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे.केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने तब्बल सात वाघ आणि दोन बिबट्यांना देशभरातील तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतरित करण्यास परवानगी दिली आहे.यामुळे गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील गर्दीने भरलेल्या पिंजऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला मिळणार आहे.विशेष म्हणजे,या अदलाबदलीचा एक भाग म्हणून हिमालयीन काळे अस्वल आणि लाल रानकोंबडी यांना गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणले जाणार आहे.स्थलांतराचा प्रस्ताव सुमारे दीड वर्षापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)कार्यालयामार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला होता.या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाल्याने,सातपैकी दोन वाघ आता रंगपहाड येथील नागालँड प्राणीसंग्रहालयात,दोन सिरमौर,(हिमाचल प्रदेश)येथील रेणुकाजी मिनी झू मध्ये आणि तीन वाघ व दोन बिबटे रोहतक प्राणी संग्रहालयात(हरियाणा)पाठवले जातील.सिरमौर येथील रेणुकाजी मिनी झू मधून दोन हिमालयीन काळे अस्वल आणि चार लाल रानकोंबड्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात आणल्या जातील.गोरेवाडा बचाव केंद्रात वाघांसाठी १० पिंजरे आणि बिबट्यांसाठी २० पिंजरे आहेत.तथापि,प्रत्यक्षात तिथे २२ वाघ आणि ३४ हून अधिक बिबटे ठेवण्यात आले होते.या गर्दीमुळे वन विभागाला वाघांना बिबट्यांच्या पिंजऱ्यात आणि बिबट्यांना अस्वल व माकडांच्या पिंजऱ्यात ठेवण्याच्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले.त्यामुळे अदलाबदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!