उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- येथील गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा प्राध्यापक पदभरतीची जाहीरात employment notice/५०/२०२३ दिनांक – ४ मे २०२३ रोजी एकूण ३० पदांचीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली.मात्र त्यामध्ये एकही पद अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव ठेवल्या गेले नाही.त्यामुळे ही पदभरती तात्काळ रद्द करावी; अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी केली आहे.
सुरपाम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या जाहीराती मध्ये इंग्रजी -१,गणीत-१, रसायनशास्त्र-४,भौतिकशास्त्र-४ कॉम्पुटर सायन्स-४,ऊपयोजीत अर्थशास्त्र -४,मराठी-४,एमबीए-४ जनसंवाद-४,विषययाकरीत असे एकूण ३० पदे प्राध्यापक म्हणून भरती प्रक्रिया राबवायची आहे.परंतु त्यांमध्ये एसी-१,विजे(ए)-१,एनटी(सी)-२, एनटी(डी)-१,एसबीसी-१,ओबीसी-९,ईडब्ल्यूएस- ३,व ओपन -९ परंतु अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता करीता राखीव एकही जागा न ठेवल्याने ही जाहीरात व प्राध्यापक पदभरती रद्द करावी व संवर्गनिहाय पदभरती न करता विषय निहाय आरक्षण देऊन पदभरती करावी; अश्या आशयाचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत,यांना निवेदन दिले असल्याने याविषयी आपन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याशी स्वत: वार्तालाप करु आणी अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव असल्याशिवाय पदभरती होणार नाही; असे आश्वासन अध्यक्ष संतोष सुरपाम यांना दिले आहे.