Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोली'गैरहजेरी वरून मुजोरी' वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून चक्क वन कर्मचाऱ्यांनी आपल्याच अधिकाऱ्याला...

‘गैरहजेरी वरून मुजोरी’ वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून चक्क वन कर्मचाऱ्यांनी आपल्याच अधिकाऱ्याला धुतले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात नुकताच ‘गैरहजेरी वरून मुजोरी’ करणारा प्रकार उघडकीस आला आहे.चक्क वन कर्मचाऱ्यांनी आपल्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या राऊंड ऑफिसर म्हणजेच वनक्षेत्र सहाय्यकास चांगलेच धुतले.महत्वाचे म्हणजे,राऊंड ऑफिसरने वनउपज तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे वन कर्मचारी मस्टरवर नामधारी सही करून गायब राहत असल्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली होती.त्याचाच राग अनावर झाला आणि दणका दिवाळी भेटल्याची माहिती आहे.प्रकरणी राऊंड ऑफिसरने वरिष्ठांकडे तसेच कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने प्रकरणास वाचा फुटली.केलेल्या मारहाणीत राऊंड ऑफिसर संतोष देगावे गंभीर जखमी झाले.
कोरची तालुक्यातील बोटेकसा वनउपज तपासणी नाक्यावर मार्गावरून वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनांची तसेच त्यातील साहित्यांची तपासणी करण्याकरीता वनरक्षक पवार,बोरकुटे,कामकाखे आणि एक रोजंदारीवरील चौकीदार अश्या चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.या चारही जणांवर देखरेख ठेवण्यासाठी राऊंड ऑफिसर संतोष देगावे यांना नियुक्त करण्यात आले.देखरेख प्रसंगी बरेचदा वनरक्षक पवार, बोरकुटे व कामकाखे एकावेळी कधीही उपस्थित राहत नसल्याचे आढळून आले.मात्र,उपस्थित न राहताच मस्टर(हजेरीपट)वर सही करून मोकळे होतात.त्यामुळे राऊंड ऑफिसर यांनी त्यांचे वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे सदरची माहिती तसेच काढलेली फोटो पाठवली.सदर प्रकाराची माहिती तिन्ही वनरक्षकांना झाली आणि दिवस उजाळण्याची वाट बघितली.तोच ताव खाल्लेल्या वनकर्मचाऱ्यांनी मनातील इच्छा पूर्ण करून ‘गैरहजेरी वरून मुजोरी’च करून टाकली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!