Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या जसे की,इंडेन,एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलिंडरसंबंधीच्या नियमांत बदल केले आहेत.चालू ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी
प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक केले आहे.ज्या ग्राहकांनी ई-केवायसी प्रक्रिया म्हणजेच आधारप्रमाणीकरण केलेले नाही; अशा गॅस सिलिंडरधारकांची जोडणी रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.त्यानुसार,
या आधी ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही रविवार १६ ऑगस्ट २०२६ होती.जी वाढवून आता २३ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे.तांत्रिक बाबी तसेच ई-केवायसीसाठी ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता सदरची मुदत आता २३ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.मुदतवाढ मिळाल्यामुळे गॅस सिलेंडरधारक ग्राहकांना आठवडाभराचा वेळ मिळाला आहे.त्यामुळे ज्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही; अशांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!