उद्रेक न्युज वृत्त :- गॅसचे दर गगणाला भिडले असतांना सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर भरणे कठिण होऊन बसले आहे.अशातच गॅस एजन्सीधारकांकडून गॅस खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून प्रति सिलेंडरवर २० ते २५ रुपये अतिरीक्त वसुली करून लूटमार सुरू आहे.
याबाबत ग्राहकांकडून फारशा तक्रारी प्राप्त होत नसल्याने गॅस एजन्सीधारकांचा अतिरिक्त वसुलीचा प्रकार सर्रास शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागात निदर्शनास येत आहे.एका घरगुती गॅस सिलिंडरची किंमत रुपये- ११६८/- असून काही गॅस एजन्सीधारक ग्राहकांकडून १२००/- रुपये घेत आहेत तर काही आपल्याच मनमर्जिने रक्कम घेतांना दिसून येत आहेत.एखाद्या सुजाण नागरिकाने गॅस पासबुक वरती रकमेची नोंद करून मागल्यास कमी रकमेची नोंद करून जास्त रक्कम वसूल केली जात असल्याचा हल्ली प्रकार दिसून येत आहे.अशातच काही ठिकाणी डिलिव्हरी बॉय अधिकचे पैसे घेत असतात.गॅस एजन्सीमधून निघणाऱ्या सिलिंडरच्या बिलातच घरापर्यंत पोहोचविण्याचे भाडे समाविष्ट राहते.एखाद्या ग्राहकाचे गाव शहरापासून जास्त दूर असेल तर तेवढे अधिक भाडे घेतले जाते.मात्र, ही सर्व बाब बिलामध्ये अंतर्भूत राहते.मात्र, गॅसएजन्सीच्या डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांना प्रतिसिलिंडर १० ते २० रुपये आगाऊचे वसूल केल्या जाते आधीच सिलिंडरच्या दराने हजारी पार केला आहे.त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे.अशातच संबंधित गॅस एजन्सी सिलिंडर सुविधेतील दरापेक्षा अतिरिक्त रक्कम ग्राहकांना मोजावी लागत आहे. त्यामुळे घरगुती गॅस धारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.