उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- आनंदाचा शिधा वाटपाबाबत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.दिवाळीसारखाच आता गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रास्तधान्य दुकानावर आनंदाचा शिधा मिळणार आहे.याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होणार आहे.यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
१ कोटी ६३ लाख रेशनकार्डधारकांना १०० रुपयांचा आनंदाचा शिधा मिळणार आहे.दिवाळीत वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधामध्ये १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तूंचा समावेश होता.मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.दिवाळीनिमित्त शासनाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांना आनंदाजा शिधा वाटण्यात आला.प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना,अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे १ कोटी ६२ लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ देण्याचा प्रयत्न झाला.आताही आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.