- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-प्रेमविवाहास कुटुंबीयांचा विरोध असतांना दोघांनी प्रेमविवाह केला.विवाहानंतर दोघेही गावातच कुटुंबापासून वेगळे राहू लागले आणि २३ वर्षीय पत्नी सात महिन्याची गभवती राहिली.अश्यातच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी सकाळच्या सुमारास तिने अचानकपणे विष प्राशन करून जीवनाचा आणि प्रेमविवाहाचा शेवट केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील कवडशी देश गावात घडली असून काल बुधवारी २४ सप्टेंबरला सर्वत्र उघडकीस आली.प्रणाली राकेश गरमडे वय २३ वर्षे,रा.कवडशी देश,ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.सात महिन्याच्या गर्भवती महिलेने अचानकपणे एवढे टोकाचे पाऊल कां उचलले? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
घटनेच्या दिवशी पती राकेश गरमडे घरीच होता.सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रणालीने कीटकनाशक फवारणीचे औषध प्राशन केले.औषध प्राशन केल्याने तिला कसेतरी वाटू लागले.त्यामुळे तिने सकाळी झोपेत असलेल्या पतीला उठवून कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे सांगितले.लागलीच पती राकेशने घराशेजारील नागरिकांच्या मदतीने पत्नीला तात्काळ नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तिथे उपचार सुरू असतांनाच गर्भवतीने प्राण सोडला.डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना देत मृतदेहाचे शवविच्छेदन केले.त्यानंतर मृतदेह स्वाधीन करण्यात आला.घटनेचा पुढील तपास शंकरपूर पोलिस करीत आहेत.
- Advertisement -

