Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-चंद्रपूर जिल्ह्याच्या व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी व्हॉलिबॉल खेळत असतांना बॉल पाण्यात गेला.त्यामुळे एकजण त्याच्या मागे धावला आणि खोल पाण्यात गेला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघे धावले असता,त्यापैकी दोघे आणि खोल पाण्यात गेलेला तरुण बुडाल्याची घटना काल,शनिवार १० मे रोजी घडली.१.पार्थ बाळासाहेब जाधव वय २० वर्षे,रा.पाथरे खुर्द ता.राहुरी जि.अहिल्यानगर,२.गोपाल गणेश साखरे वय २० वर्षे,रा.भडगाव ता.जि.बुलढाणा,३.स्वप्निल उद्धलसिंग शिरे वय २१ वर्षे,रा. रांजणगाव,कमलापूर,वाळूज, छत्रपती संभाजीनगर अशी वैनगंगा नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
पार्थ जाधव,गोपाल साखरे,स्वप्निल शिरे,पवन सतकार,सुजित देशमुख,शिवम जायभाये,सार्थक पाठक व जुनेद शेख हे गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून ते वसतिगृहात वास्तव्यास होते.काल शनिवारी आठही विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्याच्या व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात मौज-मस्तीसह व्हॉलिबॉल खेळत होते.अशातच पाण्यात गेलेला बॉल पकडण्यासाठी पार्थ जाधव हा धावला.बॉल पुढे व पार्थ मागे धावत होता.बॉलच्या नादात तो खोल पाण्यात बुडाला. त्यानंतर गोपाल साखरे,स्वप्निल शिरे व सुजित देशमुख हे धावले,गोपाल व स्वप्निल पार्थला वाचविण्याच्या प्रयत्नात बुडाले.सुजित देशमुख बचावला.वैनगंगा नदीपात्रात बुडाल्याच्या घटनेने वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!