Wednesday, March 26, 2025
Homeगडचिरोलीगडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने जागतिक जलदिनी 'जलजागृती' सप्ताहाचा समारोप
spot_img

गडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने जागतिक जलदिनी ‘जलजागृती’ सप्ताहाचा समारोप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने आज २२ मार्च २०२३ ला “जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रम” जलसंपदा विभाग सोनापुर कॉम्प्लेक्स परिसरात संपन्न झाला.सदर कार्यक्रम प्रसंगी जलदेवतेचे पूजन करून व जलदेवतेच्या प्रतिमेला माल्यार्पण  करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी जल प्रतिज्ञा घेऊन जलसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार केला.मराठी नव वर्ष व जागतिक जल दिनाचे निमित्ताने समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी पाण्याचे महत्व विशद केले.३० नोव्हेंबर २०१६ चे शासन परिपत्रकाप्रमाणे कार्यक्रमाची प्रासंगीकता  प्रास्ताविकातून विशद करण्यात आली.जलजागृती सप्ताहाच्या दरम्यान सर्वांनी पाण्याची बचत आणि पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे आणि भविष्यातील पाण्याच संकट थांबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले मार्गदर्शक जलप्रेमी मनोहर हेपट यांनी  समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना मागील ७ वर्षातील आपल्या कार्याकडे अंतर्मुख होऊन बघण्याचे आवाहन केले.एवढेच नव्हे तर  पुढील काळात आपण सर्वांनी संवेदनशील होऊन पाण्याचे महात्म्य जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना पटवून द्यावे; असेही आवाहन केले.प्रामुख्याने वातावरणातील बदल,प्रकृतीचे निसर्गाचे शोषण, समाजामध्ये वाढलेली हिंसा आणि पृथ्वीला आलेला ताप तसेच मानवाचा चंगळवाद यावर चिंतन मनन करण्याची आवश्यकता असून महात्मा गांधींच्या विचाराची व गाव स्वावलंबी होऊन तेथील जनसमुदायमध्ये जनजागृती ग्रामसभा,शाळा, महाविद्यालय यांचे माध्यमातून करण्याचा निर्धार व संकल्प,आजचे मराठी नववर्षाचे दिनी आणि जागतिक जलदिनाचे निमित्ताने उपस्थितांना आवाहन केले.’चला जाणूया नदीला आणि चला जाणूया वनाला’ या दोन्ही संकल्पनेला घेऊन आपण भविष्यात काम करूया; असा विश्वास त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला .

सदर कार्यक्रमा प्रसंगी कुमारी तुमराम,गणेश कोरे, बोधलकर,विकास दुधबावरे,स्नेहल इंगुलवार, बाळकृष्ण पंधरे,कार्तिक ढवळे,रुपेश अलाम,किशोर कोडापे,रितेश झापे,भूषण नैताम,सुरेश राठोड,आत्राम, करण गौर,अंकित किरणापुरे,साई गेडाम,अथर्व परदेशी,कु.वीरा परदेशी व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक भांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन कुमारी तुमराम यांनी व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मारले जाण्याच्या भीतीने १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी धास्तावले असून मारले जाण्याच्या भीतीने आज,बुधवार २६ मार्च रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ९ तर दंतेवाडात ६...

तरुणांनी व शेतकऱ्यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा,पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या...

भंडाऱ्याच्या महिला तहसिलदारांची उचलबांगडी.. – बदलीसह विभागीय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-अधिकार क्षेत्राबाहेरील कार्य करणे,भंडारा तहसीलच्या महिला तहसीलदार विनिता लांजेवार यांना चांगलेच भोवले आहे.प्रकरणी भंडाऱ्याच्या महिला तहसिलदारांची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उचलबांगडी...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले…

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथील ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत गुरनुले यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील घोट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!