Monday, July 13, 2026
Homeमुंबईगडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी 'उपजिविका विकास कार्यक्रम'.. - तब्बल पाच हजार...

गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘उपजिविका विकास कार्यक्रम’.. – तब्बल पाच हजार लाभार्थी कुटुंबांना होणार लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली/मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रीय सहभाग असणार आहे.१ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतके तरतूद करण्यात आली आहे.या माध्यमातून तब्बल पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यास शासन प्राधान्य देत आहे. शासनाच्या या धोरणाला प्रतिसाद देत अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत उपजिविका विकास कार्यक्रमांतर्गत काम सुरू झाले आहे.हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन,उपजिविकेत सुधारणा करणे,नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे.यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजिविका,नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन,शेतीतर उपजिविका हस्तक्षेप,सामूहिक उद्योजकता,आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल.
३० जून २०२५ पर्यंत या उपक्रमात २ हजार कुटुंबांची नोंदणी झाली आहे.एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तीकरण करून त्यांच्या जलधारण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.बोडी आधारित शेती प्रणालीत माशांचे संगोपन,त्यावर कुक्कुटपालन आणि त्याच पाण्याचा वापर पिकांना दिला जातो.ही पद्धत शेती उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देते.२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पांद्वारे  सहभागी कुटुंबांना लाभ होईल.त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुगुणी होईल.तसेच शेती उत्पादकता वाढवून उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील.शेतकरी गटांच्या माध्यमांतून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल,तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!