उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर व पिरिपाच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड.सि.एम.जनबंधू रा. कुरखेडा व सोनु साखरे रा.शिवणी (वैरागड) यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे,जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,पक्षातील विविध कार्यकर्ते यांच्या कार्यांवर विश्वास ठेऊन ॲड.सि.एम.जनबंधू आणि सोनु साखरे यांनी पक्षात पक्ष प्रवेश केला.ॲड.जनबंधू यांना कुरखेडा-कोरची क्षेत्र तर सोनु साखरे यांची गडचिरोली विधान सभा क्षेत्रासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती पत्र पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी प्रदान केले आहे.
त्यांचा निवडी बदल पिरिपाचे मारोती भैसारे,रोशन उके,जिवन मेश्राम,प्रमोद सरदारे,अनिल बांबोळे, मोरेश्वर राऊत,मानिक डोंगरे,श्रावण बारसागडे, सुंदरदास उंदिरवाडे,डॉ.गलबले, ॲड.निमगडे,ॲड. तेंभुर्णे,दयाराम खोबागडे,अनमोल कन्हाडे,मोहन मेश्राम,रमेश जोगी,हरिदास सहारे,अशोक शामकुळे, जगदिश रामटेके,नाजुक भैसारे,बंडु कुळवे,मारोती उराडे,अनमोल डोंगरे,प्रमोद भैसारे,केदारनाथ रामटेके आदीनी अभिनंदन केले तर ॲड.जनबंधु व सोनु साखरे यांनी पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे व पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.