उद्रेक न्युज वृत्त :- गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. या दोन जिल्ह्यात वनक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार क्षमता वाढविणारे शिक्षणक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करणे हे उद्दीष्ट गोंडवाना विद्यापीठाने समोर ठेवले आहे.
सध्या गडचिरोली येथील विद्यापीठ केंद्र भाड्याच्या इमारतीत आहे.या विद्यापीठावर या दोन्ही जिल्ह्यातील तरूणांचे भवितव्य अवलंबून असल्याने विद्यापीठ स्वतःच्या इमारतीत लवकरात लवकर स्थलांतरित होणे आवश्यक आहे.विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली केंद्राच्या बांधकामासाठी ८८४ कोटींचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे.अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर निधीविषयक प्रक्रिया पुढे सरकेल. त्यामुळे हे अंदाजपत्रक मंजुर करण्याकरता राज्यपाल महोदयांनी कुलपती या नात्याने त्वरित लक्ष घालावे,अशी विनंती मुनगंटीवार यांनी राज्यपाल बैस यांना केली आहे.