गडचिरोली :-दिवसा कडक उन तर सायंकाळच्या सुमारास तसेच रात्री वादळ वाऱ्यासह विजांचे कडकडाट करीत अवकाळी पाऊस विदर्भासह सर्वत्र हजेरी लावू लागला आहे.गेल्या बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पावसाचा मुक्काम सर्वत्र वाढल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे धानपीक निघण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचेसह धडकी भरली आहे.अशातच आजपासून गडचिरोली जिल्ह्यात तर उद्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडणार नसल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.तर शुक्रवार ९ मे व शनिवार १० मे रोजी गोंदिया, भंडारा,वर्धा व नागपूर या चार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी सोसाट्याच्या वाराची ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतांनाच यात आणखी भर पडून निसर्गाची अवकृपा झेलावी लागत आहे.त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ११ मे पर्यंत करणार शेतकऱ्यांचा पिच्छा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

