Tuesday, October 6, 2026
Homeनागपूरखेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक कॉलनीत घडली.लाभांश कुलदीप चंदनखेडे वय ३ वर्षे असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
कोंढाळी येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या चंदनखेडे कुटुंबियांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत मोठा खड्डा असल्याने खड्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे.साचलेल्या सांडपाण्यामुळे खड्ड्याला छोट्या तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.घटनेच्या एक दिवसांपूर्वी चिमुकल्याची आई घरकामात व्यस्त असतांना खेळता-खेळता तो घराबाहेर गेला आणि त्या खड्याजवळ पोहोचला.अंधार पडूनही लाभांश घरी व परिसरात दिसत नसल्याने पालकांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.दरम्यान,काही वेळाने लाभांश हा खड्ड्यातील साचलेल्या घाणेरड्या पाण्यात बुडाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. लागलीच नागरिकांनी त्याला खड्यातून बाहेर काढत प्रथमतः कोंढाळी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले.त्यानंतर,वडिलाने त्याला नागपूर शहराच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित करताच कुटुंबियांवर मोठा आघात झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!