Wednesday, October 7, 2026
Homeचंद्रपूरखर्रा,तंबाखूची पिचकारी मारणे पडली महागात - १७ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई...

खर्रा,तंबाखूची पिचकारी मारणे पडली महागात – १७ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-तंबाखू चघळून जागोजागी पिचकाऱ्या मारणाऱ्या जिल्हा परिषदेतील १७ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यांच्याकडून दोन हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आली. यानिमित्ताने अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडली.शासकीय कार्यालयात कानाकोपाऱ्यांत तंबाखू तसेच खर्रा यांच्या पिचकाऱ्या जागोजागी मारलेल्या असताता; कर्मचारी कामावर असताना तंबाखू खातात.मात्र, त्यांच्यावर कधीच कारवाई केली जात नाही.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या निमित्ताने कारवाईचा देखावा निर्माण केला जातो.अशीच औपचारिकता जिल्हा परिषदेत नुकतीच पार पडली.वेगवेगळ्या विभागांत तंबाखूचे सेवन करणारे कर्मचारी आणि नागरिक अशा एकूण १७ जणांवर तंबाखू नियंत्रण कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली.

त्यांच्याकडून २ हजार ७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.यात आरोग्य विभाग,शिक्षण विभाग,पाटबंधारे विभाग, उमेद कार्यालय,बांधकाम विभाग,सीडीसीसी बँक, पाणी व स्वच्छता विभाग,समाजकल्याण विभाग,वित्त विभागातील कर्मचारी आणि नागरिकांचा समावेश होता.यावेळी तंबाखूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत कार्यालयात मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. ही कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.श्वेता सावलीकर,मित्रांजय निरांजने,सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे,शंकर संगमवार अतुल शेंद्रे,सुरज बनकर यांच्यामार्फत करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!