Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीखत तस्करीवर जिल्हा प्रशासनाचा कडक ‘वॉच’.. -दोषी कृषी सेवा केंद्रांवर फौजदारी गुन्हे...

खत तस्करीवर जिल्हा प्रशासनाचा कडक ‘वॉच’.. -दोषी कृषी सेवा केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश.. – खत खरेदी करतांना विक्रेत्याने इतर औषधे वा बियाणे घेण्याची सक्ती केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा हा तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांच्या सीमांना लागून असल्याने येथून खतांची अवैध वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला खताचा कोटा परराज्यात वळविणाऱ्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकारी यांनी दिले आहेत.
  • सीमावर्ती भागात विशेष नाकेबंदी👇
धानोरा,सिरोंचा,अहेरी,भामरागड व देसाईगंज या सीमावर्ती तालुक्यांतून खत तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने विशेष नाकेबंदी सुरू केली आहे.तेलंगणा व छत्तीसगड राज्यांमध्ये काही खतांची किंमत जास्त असल्याने किंवा टंचाई असल्यामुळे महाराष्ट्रातील अनुदानित खत चढ्या दराने विक्रीसाठी बाहेर पाठविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्टद्वारे वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे.
  • पॉस मशीन व्यवहारांचे ऑडिट👇
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांच्या पॉस(PoS) मशीनवरील व्यवहारांचेही ऑडिट करण्यात येत असून,कोणत्या शेतकऱ्याला किती खत देण्यात आले आणि संबंधित शेतकऱ्याची जमीन गडचिरोली जिल्ह्यातीलच आहे कां? याची पडताळणी केली जात आहे.यामुळे बनावट व्यवहार व अनियमितता रोखण्यास मदत होणार आहे.
  • कठोर कारवाईचा इशारा👇
खतांची साठेबाजी,काळाबाजार किंवा अनुदानित खताची परराज्यात तस्करी करणाऱ्या केंद्रांवर केवळ परवाने रद्द करण्यापुरती कारवाई मर्यादित राहणार नाही,तर अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
  • शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य👇
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागू नये,यासाठी प्रशासन कटिबद्ध असून कोणत्याही प्रकारची नफेखोरी सहन केली जाणार नाही.जिल्ह्यातील खताचा साठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच उपलब्ध व्हावा,हा प्रशासनाचा प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
  • शेतकऱ्यांसाठी सूचना👇
खत खरेदी करतांना कोणत्याही विक्रेत्याने इतर औषधे किंवा बियाणे घेण्याची सक्ती केल्यास त्याबाबत त्वरित कृषी विभागाकडे तक्रार करावी. तसेच खत खरेदी केल्यानंतर पॉस मशीनची पावती अनिवार्यपणे घ्यावी. खताचा तुटवडा किंवा जादा दराने विक्री होत असल्यास संबंधित तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!