Thursday, September 10, 2026
Homeनागपूरकोर्टाने आंदोलनस्थळ रिकामे करण्याचा आदेश काढला; पण शेतकरी आत्महत्येचा एकही आदेश काढला...

कोर्टाने आंदोलनस्थळ रिकामे करण्याचा आदेश काढला; पण शेतकरी आत्महत्येचा एकही आदेश काढला नाही.. – शेतकऱ्यांसह बच्चू कडू दुसऱ्या दिवशीही आंदोलनावर ठाम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी काल,मंगळवार २८ ऑक्टोंबर पासून नागपुरात आंदोलन सुरु असून आज,बुधवार आंदोलनाचा दुसरा दिवस होता.आंदोलनामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.आंदोलनामुळे नागपूर शहरातील विविध महामार्ग बंद झाल्याने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थकांचा पाठिंबा वाढत आहे.आंदोलनामुळे अत्यंत महत्त्वाचे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले,ज्यामुळे विविध भागांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.अश्यातच आज,बुधवारी न्यायालयाने (कोर्ट)एक आदेश काढून सायंकाळी ६ वाजेनंतर आंदोलनस्थळ रिकामे करण्यास बजावले होते.या आदेशानंतरही बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम असून न्यायालयाच्या आदेशाची कॉपी पोलिसांनी आणून दिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोर्टाने एका इंग्रजी पेपरच्या बातमीवरुन हा आदेश काढला,पण शेतकरी आत्महत्येच्या बातम्यांवर एकही आदेश काढला नाही,असे बच्चू कडू म्हणाले. न्यायालयाचा अवमान करण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला न्यायालयाकडून शेतकऱ्यांसाठी अपेक्षा आहेत. आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही आंदोलनावर बसलो तर कोर्ट एका दिवसात आदेश काढते? न्यायालयाबाबत आम्ही काही बोलणार नाही,परंतु दिवसेंदिवस असे प्रकार घडत चालले तर लोकशाही टिकेल का? बच्चू कडू पुढे म्हणाले,आम्ही इथून उठायला तयार आहोत,परंतु आमची व्यवस्था पोलिसांनी जेलमध्ये करावी.जेवढी ताकद आहे तेवढी वापरा आणि आम्हाला जेलमध्ये टाका.आपण कोर्टाच्या आदेशाचे पालन करु,पोलिस आम्हाला नेण्यासाठी कशी व्यवस्था करते,हे आपण पाहू. पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी,प्रत्येक कार्यकर्ता गाडीत बसायला तयार आहे.असेही बच्चू कडू म्हणाले.बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे.या प्रमुख मागणीसाठीच त्यांनी महाएल्गार मोर्चा काढला आहे.त्यातच नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,आपात्कालीन संकटामुळे नुकसानग्रस्तशेतकऱ्यांच्या पिकांवर २० टक्के अनुदान द्या,यावर्षी उसाला प्रती टन ४ हजार ३०० रूपये एफआरपी द्या,कांद्याला किमान ४० रूपये किलो दर द्या,कांद्यावरील निर्यात बंदी,निर्यातमूल्य कायमचे हटवा,गाईच्या दुधाला प्रतिलीटर ५० रूपये तर म्हैशीच्या दुधाला प्रतिलीटर ६५ रूपये दर द्या,दिव्यांगासाठी देखील बच्चू कडू यांनी सरकारकडे मागण्या केल्या आहेत. केरळप्रमाणे दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये मदत मिळावी,प्रत्येक दिव्यांगाला अंत्योदय कार्ड देण्यात यावे, सर्व रोजंदारी मजूरांचा रोजगार हमी योजनेत समावेश करून प्रती महिना १ हजार रूपये मजुरी द्या,अश्या मागण्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!