Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले.. - बालमृत्यूचे ऑडिट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

कुरखेडा तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले.. – बालमृत्यूचे ऑडिट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवणे,माता व बालमृत्यू दर कमी करणे आणि सामाजिक अडथळे दूर करून आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.आज,बुधवार २९ ऑक्टोंबर रोजी गाभा समितीच्या बैठकीत आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बानाईत यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी(व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे)उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की,सध्याचे पॅनलधारक आरोग्य विभागाच्या अटी-शर्थींचे पालन करत नसल्याचे आढळले असून, पुढील टेंडर प्रक्रियेत कठोर व सुधारित अटी समाविष्ट कराव्यात.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पॅनलधारकांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.कुरखेडा तालुक्यात बालमृत्यूचे वाढले असून बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर चिंता व्यक्त करत त्यांनी तातडीने तालुका स्तरावर ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. “एकही बालमृत्यू निष्काळजीपणामुळे होऊ नये,”असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मिशन २८’ व ‘मिशन ४२’ नव्या स्वरूपात राबविण्याचे निर्देश👇
या आरोग्य उपक्रमांना अधिक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण रूप देऊन सातत्याने राबवावे,असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमांचे नाव बदलून जनतेपर्यंत अधिक सोप्या व आकर्षक पद्धतीने पोहोचवावे, असेही त्यांनी सूचित केले.
एटापल्लीतील सामाजिक अडथळे दूर करण्यावर भर👇
एटापल्ली तालुक्यातील काही गावांमध्ये(एकरा खुर्द, एकरा बुर्ज,हेटलकसा,देवपाडी,ताडपल्ली)प्रचलित सामाजिक प्रथांमुळे नागरिक आरोग्य सेवा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले.यावर मात करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी,बाल विकास अधिकारी आणि आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवावी तसेच आवश्यक असल्यास पोलीस व प्रशासनाची मदत घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
माता-बालमृत्यू कमी करण्यासाठी SOP तयार करण्याचे आदेश👇
महिलांच्या पोषणासंदर्भात आणि गर्भावस्थेदरम्यान आहार व्यवस्थापनासाठी आरोग्य विभागाने ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’(SOP) तयार करून सादर करावी,असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
ग्रामपंचायत व CSR निधी आरोग्यासाठी वापरावा👇
ग्रामपंचायतींच्या निधीमधून तसेच CSR निधीतून गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्यासाठी उपक्रम राबवावेत,असेही त्यांनी सांगितले.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्प स्तरावरील गाभा समित्यांच्या बैठका दरमहा घेऊन त्यांचे अनुपालन अहवाल नियमित सादर करण्याचे निर्देश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!