Monday, August 31, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा-रवी मार्गे वाघाच्या पगमार्कचे झाले दर्शन….-नागिकांनी सतर्कता बाळगावी; वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष...

कोंढाळा-रवी मार्गे वाघाच्या पगमार्कचे झाले दर्शन….-नागिकांनी सतर्कता बाळगावी; वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन राऊत यांचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

कोंढाळा(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावापासून दोन किलोमिटर अंतरावर रवी मार्गे असलेल्या साई मंदिर परिसरात,बारसागडी बोडी परिसरात तसेच काही शेतकरी बांधवांच्या शेत बांधा नाजिक आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास वाघ व वाघिणीच्या पगमार्कचे दर्शन झाल्याने गावातील शेतकरी बांधव व नागरिकांनी सतर्कता बाळगून मानवी व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता सहकार्य करावे; असे आवाहन संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे.

सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज, आरमोरी व काही तालुक्यात वाघ,वाघीण व इतर हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.त्यानुसार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तसेच शेत पिकांचे नुकसान होऊन वित्तहानी झाली असल्याचे दिसून येते.हल्ली शेतकरी बांधवांच्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे.त्यामुळे शेतातील पाणी काढण्यासाठी वा इतर कामांकरिता शेतकरी शेत बांधावर सकाळच्या सुमारास वा इतर वेळेस जात असतात.अशातच आज दिनांक- २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी कोंढाळा-रवी मार्गे परिसरात वाघ व वाघिणीचे पगमार्क आढळून आल्याची माहिती कोंढाळा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत यांना मिळताच; त्यांनी लगेच याबाबत गावातील महिला वनरक्षक सेलोट यांना माहिती दिली.माहिती देताच लगेच वनरक्षक सेलोट यांनी गावातील लाऊड स्पीकरच्या माध्यमातून ग्रामस्थांना सूचना दिल्या व घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम राबविण्यात येत आहे.परिसरात पगमार्क आढळून आल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही; त्यासाठी नागिकांनी सतर्कता बाळगून आजच्या दिवस शेत बांधावर जाऊ नये; तसेच मानवी व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता सहकार्य करावे; असे आवाहन संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!