Monday, May 4, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन करण्यात आले.ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांट हे शेतीमालावर प्रक्रिया करणारे एक आधुनिक युनिट आहे. या प्लांटमध्ये भाजीपाल्यातील पाण्याचा अंश म्हणजेच ओलावा  काढून त्यांना वाळवण्याची प्रक्रिया केली जाते. विशेषतः प्लांटमध्ये कांदा,बटाटा,टमाटर व इतर भाज्यांना यंत्रात नियंत्रित तापमानाचा वापर करून वाळवल्या जाते,ज्यामुळे त्यातील पोषकतत्वे टिकून राहतात.यामुळे भाज्यांची टिकण्याची क्षमता वाढते आणि त्या खराब होत नाहीत.त्यानंतर,वाळवलेल्या भाज्यांचा वापर सूप,इन्स्टंट फूड,मसाल्यांमध्ये आणि प्रवासात सहज करता येतो.हा एक फायदेशीर कृषी-आधारित व्यवसाय आहे,जो नाशवंत भाजीपाल्याची नासाडी रोखतो. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत असे प्रकल्प सुरू करण्यासाठी ३५ टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते.या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीबरोबरच कृषी क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरणार असून,स्थानिक उत्पादनाला नवी दिशा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे.
या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम, भाजपचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी,कोंढाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन सेलोटे,सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार,अरुण कुंभलवार, माजी सैनिक ईश्वर राऊत,दिगांबर धोटे,गोविंद बरडे,प्रल्हाद राऊत,प्रा.पंकज धोटे,संतोष धोटे,सागर वाढई,
मुख्याध्यापक देशमुख,शिक्षक कुथे,शरद धोटे,एकनाथ पत्रे,प्रदीप तुपट,विवेक राऊत,विनायक अलोने,मनोहर राऊत, कैलास डेंगानी,अभि शेंडे,गिता धोटे,शोभा धोटे, निकिता धोटे,प्रमिला राऊत यांचेसह परिसरात शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!