Wednesday, June 17, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे नितीन राऊत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…-काँग्रेस नेते रामदास मसराम...

कोंढाळा येथे नितीन राऊत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…-काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवारांनी नोटबुक, बिस्कीट,टी-शर्ट व घड्याळचे केले वाटप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज):-कुणाशीही बोलतांना चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारे,हसमुख चेहरा, कितीही दुःख असले तरीही स्वतः पचविण्याची क्षमता बाळगणारे,आनंदात आणि उत्साहात सर्वांची जोमाने कामे करणारे,गावातील तरुणांना रोजगार देणारे, सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे,ऑल वेज पॉझिटिव्ह विचाराचे असे व्यक्तिमत्व असणारे गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील निवासी माजी पंचायत समिती उपसभापती तथा देसाईगंज तालुका कोंग्रस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत यांचा ४५ वा वाढदिवस आज,गुरुवार दिनांक-२५ जुलै ला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते तथा शेतकरी नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांच्या तर्फे कोंढाळा गावामध्ये मोठ्या थाटात तसेच उत्साहात साजरा करण्यात आला.

नितीन राऊत यांच्या ४५ व्या वाढदिवस दिनाचे  औचित्य साधून काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांच्या तर्फे उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले.गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रसंगी काँग्रेस नेते रामदास मसराम म्हणाले की,नितीन राऊत यांचा ४५ वा वाढदिवस शालेय विद्यार्थी,गावातील प्रतिष्ठित नागरिक,गावकरी मंडळी यांच्या सोबत साजरा करीत असतांना मोठा आनंद होत आहे.नेहमी हसमुख व ऑल वेज पॉझिटिव्ह विचार मनात बाळगणारे राऊत यांना वाढदिवस दिनी उदंड आयुष्य लाभो; अशा शुभेच्छा देऊन शालेय विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा; शंभर मित्रांपैकी जीवनात पाच च मित्र चांगले विचाराचे असावे.वाईटाच्या संगतीने जाऊ नये; शिक्षणाशिवाय पर्याय नाही.चांगले,वाईट व इतर घडामोडींना आकार देण्याचे काम हे केवळ शिक्षणच करीत असते.त्यासाठी सर्वांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे; यावेळी मार्गदर्शनपर विचारातून मसराम बोलत होते.

कार्यक्रमा नंतर केक कापून राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यानंतर काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील संपूर्ण ३२५ शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक व बिस्कीटचे वाटप करून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर गावातीलच विद्या निकेतन संकुल लोकमान्य टिळक विद्यालयातील १४० विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत नोटबुक आणि बिस्किटे वाटप करण्यात आली. गावातील पानठेलेधारक नागरिकांना घड्याळ तसेच गावातील नागरिकांना टी-शर्ट,त्याचप्रमाणे थैले वाटप करण्यात आले.रामदास मसराम यांनी गोर गरीब जनतेची कळकळ लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकूण सात आरोग्य मेळावे आयोजित केली आहेत.त्याचबरोबर आता संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना जवळपास २५ हजाराच्यावर मोफत नोटबुकचे वितरण करण्यात येणार आहे.

नितीन राऊत यांच्या वाढदिवस दिनी,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, गावच्या प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा राऊत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,देसाईगंज ओबीसी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे, देसाईगंज युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पिल्लेवान,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सीताराम धोटे,बाबुराव राऊत,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,विद्या निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख,शिक्षक टेंभुर्णे,हर्षे, हितेश तुपट,निलेश दुपारे,अक्षय राऊत,जयंत दुपारे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वितेसाठी सागर वाढई,गौरव शीलार,जितू चौधरी,स्वप्नील मीसार,आकाश पेटकुले तथा मित्र परिवार यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून सुमारे ५३ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!