उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे आज २५ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास देसाईगंज काँग्रेस पक्षातील पदाधिकारी यांच्या तर्फे ‘हात से हात जोडो’ अभियानास गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ‘काँग्रेस पक्षाच्या एकजुटीचा विजय असो’ असे नारे लावीत अभियानास सुरुवात करण्यात आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘हात से हात जोडो’ मोहिम नुकतीच संपूर्ण तालुक्यात सुरू करण्यात आली आहे.याच निमत्ताने कोंढाळा येथील मुख्य चौक,घरोघरी तसेच गावातील नागरिकांच्या भेटी घेत सदर अभियानाचे महत्व नागरिकांना पटवून पटवून देण्यात आले.
सदर अभियाना प्रसंगी ‘नफरत छोडो हात से हात जोडो ‘च्या घोषणा देत संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली.अभियानात मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी सहभाग घेतला.काँग्रेसला साथ देऊन देशाला अंधाराच्या गर्दीतून प्रकाश वाटेवर घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा स्वर्णीम भारत घडवू या; असे पत्रक नागरिकांना वितरित करण्यात आले.
‘हात से हात जोडो’ अभियाना प्रसंगी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,युवक तालुकाध्यक्ष पंकज चहांदे,
ओबीसी तालुकाध्यक्ष अरुण कुंभलवार,कुरुड- कोकडी समन्वयक संदीप वाघाडे,देसाईगंज तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत,कोंढाळा ग्रामपंचायत उपसरपंच गजानन सेलोटे,संजय करांकर उपसरपंच विसोरा,भीमराव नगराडे माजी नगरसेवक नगरपरिषद देसाईगंज,सुरेश मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली,मनोहर निमजे तालुका महासचिव,नरेंद्र गजपुरे माझी उपसरपंच पोटगांव,गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले होते.