Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील जावयाचा सावंगी जवळ अपघात; घटनास्थळीच मृत्यू..

कोंढाळा येथील जावयाचा सावंगी जवळ अपघात; घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आपल्या स्वगावाहून  माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी दुचाकीने जात असतांना वाटेतच लाखांदूर-देसाईगंज(वडसा)राष्ट्रीय महामार्गावरील सावंगी जवळ दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील ४० वर्षीय जावयाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवार २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली.योगेश ज्ञानेश्वर पारधी रा.करांडला, ता.लाखांदुर, जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.योगेश पारधी हे कोंढाळा येथील हिरामण बुराडे यांचे जावई होते.
माहितीनुसार,योगेश पारधी हे दुचाकी क्रमांक- एमएच-३६ डी ६२४० ने करांडला येथुन कोंढाळा येथे जाण्यास निघाले होते.योगेश पारधी यांची पत्नी कोंढाळा येथील हिरामण बुराडे यांची मुलगी असून
सोमवारी २१ एप्रिल रोजी ती माहेरी कोंढाळा येथे आली होती.त्यामुळे योगेश पारधी हे पत्नीला आणण्यासाठी दुचाकीने कोंढाळा येथे जात असतांना लाखांदूर-देसाईगंज(वडसा)राष्ट्रीय महामार्गावरील सावंगी जवळ देसाईगंज वरून लाखांदूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक-एमएच ३० एबी २४२८ ने योगेश पारधी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात योगेश पारधी हे घटनास्थळीच गतप्राण झाले.धडक इतकी जोरदार होती की,दुचाकीच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.सदर अपघाताची माहिती मार्गावरील प्रवाशांनी देसाईगंज पोलिसांना दिली.पोलीसांनी घटनास्थळ गाठून पळून जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून लाखांदूर येथे पकडला.ट्रक चालक शंकर भास्कर खेडकर रा.नेरी,ता.चिमुर,जि.चंद्रपुर यांस देसाईगंज पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनानंतर मृतकाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!