Tuesday, September 22, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा गावात वाघाची एंट्री; अंगणात आढळून आले पगमार्क... - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण;...

कोंढाळा गावात वाघाची एंट्री; अंगणात आढळून आले पगमार्क… – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; बंदोबस्त करण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज) :-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात वाघाने एंट्री केल्याची घटना आज,९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोंढाळा गावापासून आरमोरी-गडचिरोली मार्गे अवघ्या ३०० मीटर अंतरावर जंगल परिसर लागून आहे.जंगल परिसरात मागील गेल्या सहा ते सात वर्षांपासून हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढलेला दिसून येतो आहे.यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात कोंढाळा गावातील अभिमन झिलपे व लव्हा मेश्राम जागीच ठार झाले होते.तर एक इसम शेतावर जात असतांना वाघाशी दोन हात करून थोडक्यात बचावला होता.अशातच आता आज ९ ऑगस्टला बसस्थानक नजिक परिसरात वास्तव्यास असणारे सुनील धाकडे यांच्या घरासमोरील अंगणात वाघ वा वाघिणीचे पगमार्क आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पगमार्क केवळ अंगणातच आढळून आले नाहीत तर मुख्य मार्गावरून लागूनच असलेल्या स्मशानभूमी परिसरातील बीएसएनएल टॉवर आणि नहराच्या चिखलात दिसून आले आहेत.सध्या स्थितीत कोंढाळा जंगल परिसरात वाघ,वाघीण व तिचे तीन पिल्ले असल्याची माहिती आहे.कदाचित वाघिणीचे पिल्ले भरकटल्याने पिल्ले व वाघीण गावशेजारी आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.अंदाज जरी वर्तविण्यात येत असला तरीही एखादा इसम त्यांच्या तावडीत सापडल्यास ठार झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे एखद्यावेळेस अनुचित घटना घडून नाहक कुणाचा बळी जाऊ नये; याकरीता वन विभागाने तात्काळ दखल घेऊन हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत व ग्रामवासिय जनतेंनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!