Tuesday, August 11, 2026
Homeकुरुडकोंढाळा- कुरुड डांबरीकरण रस्त्याची दैनावस्था

कोंढाळा- कुरुड डांबरीकरण रस्त्याची दैनावस्था

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरूड :- कोंढाळा वरून कुरुड मार्गे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याची दैनावस्था झाली असून या ठिकाणाहून वाहनधारक,सायकलस्वार,बैलबंडीधारक शेतकरी यांना जीव धोक्यात घालून ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करून तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कुरुड या ठिकाण राईस मिल,प्राथमिक आरोग्य केंद्र व आजुबाजुला शेतकऱ्यांच्या शेत्या असल्याने कोंढाळा वरून कुरुड मार्गे दररोज ये-जा करावी लागते.परंतु डांबरीकरण रस्ता काही ठिकाणाहून पूर्णपणे उखडून गेल्याने रस्त्यावरील डांबर दिसेनासा होऊन  डांबरीकरण रस्ता भुईसपाट झाला आहे.रस्ता भुईसपाट झाल्याने गिट्टी वर येऊन डोके काढून पाहू लागली आहे.त्यामुळे एखादे वेळेस वाहनधारक वा सायकलस्वार यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डांबरीकरण रस्त्याचे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देसाईगंज तर्फे काम करण्यात आले.सदर कामावर अंदाज पत्रकिय तरतुदीनुसार १५ लाख ५६ हजार ७०८ रुपये खर्च करण्यात आले.मात्र डांबरीकरण रस्ता गावाबाहेर असल्याने त्या ठिकाणी डांबर व इतर साहित्यांचा योग्य प्रमाण न वापरला गेल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येते.तसेच याच ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले; मात्र खड्डे एकीकडे व काम दुसरीकडे असा प्रकार दिसून येत असल्याने लाखो रुपये खर्च करूनही डांबरीकरण रस्ता जैसे थे अवस्थेत झाला असल्याचे दिसून येत आहे .

याकरिता या रस्त्याकडे दुर्लक्ष न करता वा हलकी फुलकी डागडुजी न करता योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!