Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीकेवळ 'या' महिलांनाच मिळणार तीन सिलेंडर मोफत.. - लाभार्थींनी ई-केवायसी करणे...

केवळ ‘या’ महिलांनाच मिळणार तीन सिलेंडर मोफत.. – लाभार्थींनी ई-केवायसी करणे आवश्यकच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.या योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधीत लाभार्थींनी आपल्या गॅस एजंन्सीमध्ये संपर्क करावा; तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
अशी करा ईकेवायसी👇
ई-केवायसी गॅस डिस्ट्रीब्युटर शोरूममध्येही करता येइल किंवा एच.पी.पे.ॲपवरून सेल्फ ई-केवायसी करता येते.ई-केवायसी ही एक साधी १ मिनिटाची प्रक्रिया आहे.ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे.
ग्राहकांनी गॅस साठी बुकींग ऑनलाईन करावी.तसेच ३ सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सी मार्फत वसुल करण्यात येईल.त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडर खरेदी केल्यानंतर ३ सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खातेमध्ये सबसिडीच्या रुपात जमा होईल.या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.कुटुंबप्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राहय धरले जाणार नाही.त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे.
गडचिरोली जिल्हयात एकुण २३ गॅस परवानाधारक असून त्यापैकी  भारत पेट्रोलियम (बीपीसीएल)-६, इंडियन ऑइल (आय.ओ.सी.एल.)-२, हिंदुस्थान पेट्रोलियम (एच.पी.सी.एल.)-१५ गॅस एजन्सी कार्यरत असून ई-केवायसी प्रक्रिया पुर्णपणे मोफत आहे. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा; असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!