उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील शंकरपूर व परिसरातील शेतकरी बांधवांनी कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी आज १६ मार्च २०२३ रोजी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आक्रमक पावित्रा घेत देसाईगंज येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत उर्जा विभागाचेव्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनातुन २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.
आंदोलना दरम्यान येथील शेतकऱ्यांनी एकुणच शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत २४ तास वीज पुरवठ्यासाठी आग्रही असलेल्या आमदारांनी सत्तेत येताच शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले असल्याने येत्या निवडणुकांत तालुक्याच्या कोणत्याही गावात प्रचार करू न देण्याचा एकमताने निर्णय घेत ‘जो किसान की बात करेगा,वही देश पे राज करेगा’ च्या जोरदार घोषणा देत परिसरातील हजारो संख्येच्या सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.
दरम्यान आंदोलन हिंसक वळण घेणार नाही याची दक्षता घेत देसाईगंज पोलिसांनी शेकडो आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. यात प्रामुख्याने जेष्ठ नेते परसराम टिकले,सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके,नंदु नरोटे,पिंकु बावणे,नितीन राऊत,वामन सावसाकडे, गजानन सेलोटे,विलास बन्सोड,विलास ढोरे,होमराज हारगुळे,नरेशलिंगायत, विनायक वाघाडे,जगदीश शेंद्रे,मनोज ढोरे,अभय नाकाडे,महेश भरणे,अभय बुद्धे,आशिष गभने,युवराज गभणे,चक्रधर नाकाडे,बालु दुनेदार,यादव बन्सोड,संदिप वाघाडे,उमाशंकर हारगुळे,गणेश वारगुळे आदी शेतकऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी स्थानबद्ध करून अटी व शर्थिच्या अधिन राहुन सोडले.तथापी शेतकऱ्यांची मागणी पुर्ण करण्याकडे दुल॔क्ष करून तोंडाला पाने पुसल्या गेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत येत्या तीन दिवसाच्या आत मागणी मान्य करून किमान १६ तास वीज पुरवठा करण्यात न आल्यास देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.