Monday, July 27, 2026
Homeदेसाईगंजकुलूपबंद घराच्या प्रवेशद्वाराजवळ अंधारात दडून बसला होता सराईत गुन्हेगार.. - देसाईगंज...

कुलूपबंद घराच्या प्रवेशद्वाराजवळ अंधारात दडून बसला होता सराईत गुन्हेगार.. – देसाईगंज पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देशात बेरोजगारी जरी वाढली असली तरीही गुन्हेगारीकडे वळणे त्यावरील उपाय नाही.मला नोकरी वा इतर क्षेत्रात संध्या मिळत नसल्याने आता मी चोरी,डकैती,अवैध वसुली करून  गुजारा करतोय,असे करणे म्हणजे आयुष्य बर्बाद करण्यासारखे आहे.वाम मार्गाने गोळा केलेला पैसा चिरकाल टिकणारा नसतो.वाम मार्गावरील पैश्याचे सुख हे क्षणिक असते.इतरांनी घाम गाळून कमावलेल्या पैश्यांवर टाकलेली नजर ही एक दिवस कमजोर होऊन दारोदार फिरवायला लावत असते. कितीतरी गुन्हेगारांनी चुकीचे मार्ग सोडून चांगले आयुष्य जगून जीवनाचे खरे सोने केले आहे.अश्यातच देसाईगंज शहरातील सराईत गुन्हेगार चोरीचे डाव साधण्याचा प्रयत्न करत असतांनाच पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला आहे.३५ वर्षीय रामचंद्र पोचन्ना ठाकरे रा.विर्सी वार्ड,देसाईगंज, जि.गडचिरोली असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देसाईगंज शहराच्या एकता कॉलनीतील एक कुटूंबीय बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरातील लाईट बंद करून घराला कुलूप लावलेले होते.चोऱ्या वा घरफोड्या करणारे गुन्हेगार हीच संधी साधून संधीचे सोने करून घेत असतात. त्यातच शहरातील पोलीस प्रशासन अश्यांवर आळा घालण्यासाठी गस्त घालून शहराला सुरक्षा कवच प्रदान करीत असतात.घटनेच्या तीन दिवसांपूर्वी  अश्याच प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर व अंमलदार बालमुकुंद मेश्राम हे शहरात गस्त घालत असतांना एकता कॉलनीत रात्रीच्या सुमारास कुलूपबंद असलेल्या एका घराच्या प्रवेशद्वाराजवळ रामचंद्र ठाकरे हा अंधारात बसलेला दिसून आला.त्यातच त्याने तोंडाला रुमाल बांधलेली असल्याने शंका बळावली.अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.ताब्यात घेत ठाण्यात नेले असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार रामचंद्र ठाकरे यास देसाईगंज पोलिसांनी जेरबंद केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!