उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड गावातील घनश्याम खोब्रागडे वय अंदाजे ५५ वर्षे या इसमाने सकाळच्या सुमारास ७ वाजेच्या दरम्यान शेतशिवरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
सकाळच्या सुमारास शेतीला पाणी देण्याकरिता काही नागरिक गेले असता; त्यांना एका झाडाला एक इसम लटकलेल्या अवस्थेत दिसला.सदर घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील मंगेश मडावी यांना देण्यात आली.माहिती मिळताच लगेच त्यांनी घटनास्थळ गाठुन पोलीस स्टेशन देसाईगंज यांना कळविण्यात आले.
आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहेत.