Sunday, August 9, 2026
Homeकुरुडकुरुड येथे होणार सुसज्ज वाचनालयाची इमारत….-ओबीसी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस मनोज भाऊ...

कुरुड येथे होणार सुसज्ज वाचनालयाची इमारत….-ओबीसी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस मनोज भाऊ ढोरे यांच्या प्रयत्नांना यश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(कुरुड) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांची कळकळ लक्षात घेता ओबीसी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस मनोज भाऊ ढोरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या स्थानिक निधीतून सुसज्ज वाचनालयाच्या इमारती करीता भरीव निधी खेचून आणून गावात वाचनालयाच्या इमारत बांधकामाचे नुकतेच भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

ओबीसी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस मनोज भाऊ ढोरे हे नेहमीच युवा वर्ग,गोर-गरीब नागरिक, आबालवृद्ध तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठले ना कुठले तरी उपक्रम राबवून सामाजिक,शैक्षणिक व इतर कार्य करीत असतात.स्वतःच्या वाढदिवशी दिनी वेगवेगळे सामाजिक कार्य करून शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे,रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून त्यांना दिलासा देणे तसेच इतर रोजगाराभिमुख बेरोजगार तरुणांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे,आरोग्यविषयक शिबिरे घेऊन समाजकार्यात स्वतःला झोकून देत आहेत.खरे म्हणजे ‘एकच ध्यास आणि गोर गरीब जनतेचा सर्वांगीण विकास’ असे त्यांचे म्हणणे आहे.

अशातच त्यांच्या मते,२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हे त्यांचे ब्रीद असून,त्या प्रमाणे सर्वांनी कार्य केले पाहिजे; अशी त्यांची मनधरणी असून त्याप्रमाणे मनोज भाऊ ढोरे हे कार्य करीत आहेत.त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सुशिक्षित बेरोजगारांना तसेच विद्यार्थी वर्गांना वाचनाची सवय जडावी; यासाठी स्थानिक निधीतून सुसज्ज वाचनालयाच्या इमारती करीता भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे.त्यानुसार कुरुड गावामध्ये नुकतेच वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन गावातील प्रथम नागरिक सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम,उपसरपंच क्षितिज उके,ओबीसी काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस मनोज भाऊ ढोरे,ग्रामपंचायत सदस्य शंकर भाऊ पारधी,अविनाश गेडाम,विलास पिलारे,रेखाताई मडावी,आशाताई मिसार व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.सुसज्ज वाचनालयाच्या इमारती करीता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावातील सुशिक्षित युवक-युवती,बेरोजगार बंधू आणि समस्त गावकरी यांनी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!