उद्रेक न्युज वृत्त
कुरुड(देसाईगंज) :- शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम यांच्या निवासस्थानी काल दिनांक-१० एप्रिल २०२४ ला सायंकाळी महाविकास आघाडीची भव्य बैठक संपन्न झाली, सदर बैठकीत विविध निवडणुकी संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली व डॉ.नामदेव किरसान या उच्च शिक्षित,दूरदृष्टी असलेल्या उमेदवारालाच जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे “अबकी बार भाजपा तडीपार” करण्याचे ठरवण्यात आले व प्रत्येक बूथ मजबूत करण्याचे ठरवण्यात आले आहे.
माजी जिप सदस्य दिगांबर मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली.माजी सरपंच मनोहर निमजे उपाध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम,काँग्रेसचे ओबीसी महासचिव मनोज ढोरे,माजी जिप सदस्य सुरेश मेश्राम,काँग्रेस नेते विजय कुंभलवार,लीलाधर भर्रे,डॉ.श्रीकांत बनसोड,डॉ. मीनाक्षी बनसोड,उपतालुका प्रमुख विलास ठाकरे, नुकतेच भाजपाला सोडचिट्टी देऊन संविधान रक्षणासाठी लोकांना जागृत करणारे जेष्ठ पत्रकार राजरतन मेश्राम,माजी नगरसेवक प्रकाश सांगोळे, दादाजी कांबळी,बंडु कांबळी,भाष्कर ठाकरे, शालिकराम मेश्राम,माधव दिघोरे,ताराचंद पारधी,जेष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रल्हाद मेश्राम,गायक विजय पारधी, प्रमोद नाकतोडे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुलाराम लाकडे,खुशाल पिलारे,सदानंद दोनाडकर,युवक काँग्रेसचे अमर भर्रे,यादव पारधी,जेष्ठ शिवसैनिक दादाजी वाटकर,माजी ACF मोहनजी रामटेके,ईश्वर ढोरे,मंगेश गणवीर, दिलीप नंदनवार,वाघमारे बबन गणवीर,गंगाधर खोब्रागडे,कुणाल ठाकरे व कुरुड येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.