Wednesday, August 5, 2026
Homeनागपूरकुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् नागपुरात दंगल घडली..

कुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् नागपुरात दंगल घडली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला औरंगजेबाची कबर हटाव मोहिमे अंतर्गत पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.बाबरी पाडण्याच्या वेळी शांत राहिलेल्या नागपूरमध्ये सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी औरंगजेबाची कबर पाडण्याच्या मागणीसाठी दंगल उसळली.विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या निदर्शनांमध्ये कुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् दंगल उसळली.
ज्या महाल भागात आरएसएसचे मुख्यालय आहे त्याच भागातून हिंसाचार सुरू झाला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाल परिसरातून  आमदार आहेत.दंगल उसळीत जमावाने उभ्या वाहनांना आग लावली,घरांची तोडफोड केली आणि पोलिसांवरही हल्ला केला.यामध्ये ३ डीसीपींसह ३३ पोलिस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू(संचारबंदी) लागू करण्यात आला आहे. हिंसाचारग्रस्त भागात पोलिस ध्वज मार्च काढत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल हे या हिंसाचाराला सुनियोजित कट म्हणत आहेत. फडणवीसांच्या मते,व्हॉट्सॲपवर व्हिडिओ व्हायरल करून लोकांना गोळा करण्यात आले.यातर हिंसाचार झाला.हिंसाचाराच्या वेळी हाणामारीसह रात्रीच्या सुमारास एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली.जिकडे-तिकडे सळो की पळो अशी परिस्थिती निर्माण झाली होती.पहिल्यांदा उपराजधानीला गालबोट लागल्याने सगळीकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!