उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुका शाखेच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी कार्यकर्त्यांची बैठक कुरखेडा येथील विश्रामगृहात पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर बैठकीला पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गोपाल रायपुरे,पिरिपाचे संपर्क प्रमुख दिलीप पाटिल नागपूर आदी लाभले होते . बैठक प्रसंगी प्रा.कवाडे पिरिपा कार्यकर्यांना बोलतांना म्हतले की,आपणास राजकारण पेक्षा समाजकारण जास्त करावयाचे आहे.निवडणुका होतील तेव्हा होतील आपण आपली तयारी ठेवली पाहीजे.जिल्हयात अनेक समस्यां आहेत.बेरोजगारी वाढली आहे,नोकरी नाही,गरीबांच्या हाताला काम नाही;अश्या परिस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांनी समाज हिताचे कार्य केले पाहीजे आणि डॉ.आंबेडकरांच्या कार्याला गती दिली पाहीजे.प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी गडचिरोली जिल्हयातील समस्या सांगून त्या सोडविण्याचे प्रा.कवाडे यांच्याकडे सांगीतले.
सदर बैठकीला पिरिपाचे प्रमुख कार्यकर्ते अँड.सि.एम जनबंधु,प्रमोद सरदारे, मानिक डोंगरे,भुषण सहारे, सोनु साखरे,दयाराम खोबागडे, संतोष खोब्रागडे, अनिल बांबोळे,मोरेश्वर राऊत,अशोक अंबादे,रमेश जोगे,दादाजी रामटेके,वामन कोंटागले,बालक भानारकर,कार्तीक वट्टे,मानिक वालदे सहीत बहुसंख्य पिरिपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.प्रमोद सदर बैठकीप्रसंगी सरदारे यांनी आभार मानले .