उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- किसाननगर(व्याहाड खुर्द)येथील गोरगरीब अजुनही निर्वासितांचे जिवन जगतांना दिसून येत आहेत.सर्वप्रथम त्यांच्या समस्या सोडविणे महत्वाचे आहे.तरच तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीचे अनावरण सार्तक होणार असून रिपब्लिकन पक्षाने यासाठीच जन्म घेतला आहे.असे प्रतिपादन बुद्ध मूर्तीचे अनावरण करतांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,लाँग मार्च प्रणेते तथा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी किसाननगर येथील बुद्ध मुर्तीच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी केले.दानशुर स्मृतीशेष डॉ.अर्जुनदास बिके स्मृतीदिनी किसान नगर (व्याहाड खुर्द) येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना समारोह सोहळा प्रसंगी मार्गदर्शक म्हणुन माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे,रिपाईचे विदर्भ सरचिटणीस सीद्धार्थ सुमन,पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,पिरिपाचे कार्याध्यक्ष मुर्लीधर भानारकर, सरपंच्या बिके ताई,मुन्ना बिके, हरदयाल गलगट,मुक्तेश्वर नगराळे,रिपाईचे किशोर उंदिरवाडे,मारोती भैसारे,दिलीप गोवर्धन आदि लाभले होते.याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी मार्गदर्शन केले तर गोपाल रायपूरे यांनी किसाननगरच्या समस्या, स्मृतिशेष डॉ.बिके यांच्या विषय विस्तृत माहीती दिली. रात्रीच्या सुमारास विजय शेन्डे यांच्या भिम गितांचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे संचालन खोब्रागडे तर आभार सुरेश बांबोळे यांनी मानले.कार्यकमास बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.