उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : –औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा येथील विविध व्यवसायाची कालबाहय झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री, संयंत्रे व साहित्य उपकरणे जसाच्या तश्याच अवस्थेत लिलाव करणेसाठी दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कुरखेडा येथे लिलाव करण्यात येणार आहे.तरी इच्छुक खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कुरखेडा येथे त्यांचेकडे असलेल्या अधिकृत अभिलेखासह उपस्थित राहावे.किमान ३ खरेदीदारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कुरखेडा जि.गडचिरोली यांनी कळविले आहे.