Sunday, September 6, 2026
Homeनागपूरकारसह तीन तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू...

कारसह तीन तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कारसह तीन तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात काल,सोमवारच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.घटना घडताच बघ्यांनी गर्दी केली.घटनेबाबत पोलिसांना कळताच बुटीबोरी पोलिसांकडून तातडीने  बचावकार्य सुरू होते.कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. रस्त्यालगतच असलेल्या विहिरीला कठडा नसल्याने रस्त्यावरून अनियंत्रित कार थेट विहिरीत गेली.कार विहिरीत कोसळल्यानंतर गाडीतील तरुणांना बाहेर पडता आले नाही.तिघेही आतच अडकले होते.त्यामुळे तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.बुटीबोरी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.तरुणांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.रात्रभर बचावकार्य सुरू होते.अपघात घडण्यामागचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही.मात्र,कार शिकत असतांना चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मृतांची नावे अद्यापही स्पष्ट व्हायची असल्याने नावे कळू शकली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!