उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आता काय सांगू दादा, मोठ्या हौशीने साहेबांची ५ हजाराची जाहिरात दिवाळीला लावली.दिवाळी संपून ६ महिने लोटून गेलेत,पण साहेबांना वेळच मिळत नसल्याने अख्खी मेहनत वाया गेली की काय? अशी म्हणण्याची पाळी आली आहे.वाटलं होतं साहेब मस्त गोर-गरिबांच्या घरी भेटी देतात,मस्त गावोगाव फिरतात,त्यामुळं चला बा साहेबांना प्रसिध्दीच्या झोतात नेऊन पाहू..! प्रसिध्दीच्या झोतात नेऊन दिवाळीही झाली तरीही आम्हा गोर-गरीबांकडे साहेबांचे लक्षच नाही.आता असं वाटू लागले की,साहेब नुसता देखावा तर करत नाही नां..! कार्यकर्त्याला विचारले तर मिळतील म्हणून लांबणीवर नेऊ लागला,इतरांचे बील म्हणून पैसे थांबवू लागला.प्रेशर आणतो म्हटलं तर साहेब आहे वरच्या पातळीचा,खालची पातळी त्याला काही जमेना..! अन् काम काही होईना..! ५ हजाराला साहेबाने लावला चुना आता बोंबला म्हणा..! अशीही म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळं आणखी काय म्हणावे बावा गडचिरोलीच्या साहेबाची हौशीने दिवाळीला जाहिरात लावली; पण साहेबाने आम्हालाच तिर्री दावली..!