Thursday, October 22, 2026
Homeदेसाईगंजकाय सांगता..? देसाईगंजच्या चोप येथील शेत शिवारात आढळला चक्क सात फुटाचा अजगर..!

काय सांगता..? देसाईगंजच्या चोप येथील शेत शिवारात आढळला चक्क सात फुटाचा अजगर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील शेत शिवारात आज,सोमवार २६ मे रोजी सकाळच्या चक्क सात फुटाचा अजगर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची काहीकाळ भंबेरी उडाली होती.लागलीच याची माहिती चोप येथील सर्पमित्र तुषार उईके यांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठत तब्बल सात फूट लांबीच्या अजगर सापाला  कुशलतेने पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,चोप येथील काही शेतकरी आज सोमवारी सकाळच्या सुमारास शेत बांधावर कामे करीत असतांना त्यांना जीवन बावणे यांच्या शेतात एक भला मोठा साप दिसून आला.त्यामुळे शेतात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची काहीकाळ घाबरगुंडी उडाली.त्यानुसार लागलीच गावातील सर्प मित्र तुषार उईके व दीपक पंडेल यांना पाचारण करण्यात आले.तुषार उईके यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत मोठ्या कौशल्याने सात फूट लांबीच्या अजगर सापाला पकडले व काही वेळातच त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.भल्या मोठ्या सापाची बातमी गावात पसरताच घटनास्थळी काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
  • शंभरहून अधिक सापांना जीवनदान👇
चोप येथील सर्पमित्र तुषार उईके हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत.सापांना पकडून त्यांना जीवदान देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.त्यांनी आतापर्यंत जवळपास शंभरहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे.ज्यात अनेक विषारी आणि बिनविषारी सापांचा समावेश आहे. सर्पमित्र तुषार उईके यांचे हे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.ते केवळ सापांना जीवनदान देत नाहीत,तर मानवी वस्तीत साप शिरल्यास होणारा धोकाही टाळतात आणि वन्यजीव संरक्षणात मोलाची भर घालतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!