Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीकवंडे जंगल परिसरातील नक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी..

कवंडे जंगल परिसरातील नक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भामरागड तालुका मुख्यालयापासून २८ किलोमिटर अंतरावर असलेले कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव आहे.कवंडे जंगल परिसरात नुकतेच २३ मे २०२५ रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईदरम्यान दोन पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेचे सुस्पष्ट तपशील समजून घेण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये अधिकृत दंडाधिकारी चौकशी राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी एटापल्ली यांच्या न्यायालयात जाहीर चौकशी करण्यात येत असून,या घटनेची साक्ष असणाऱ्या नागरिकांनी किंवा घटनेच्या अनुषंगाने कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या व्यक्तींनी लेखी स्वरूपात शपथपत्रासह आपले निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदनात प्रत्यक्षदर्शी अनुभव किंवा घटनेचे वर्णन, घटनेपूर्वी किंवा नंतर घडलेली संबंधित घडामोड, सरकारी किंवा इतर यंत्रणांचा सहभाग किंवा प्रतिक्रिया,या प्रकरणाशी संबंधित अन्य उपयुक्त माहिती आदी मुद्द्यांवर माहिती देणे अपेक्षित आहे.सदर निवेदन १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी, कार्यालयात सादर करावे,असे एटापल्लीचे उपविभागीय दंडाधिकारी नमन गोयल यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!