Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीकर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी शासनाकडून करण्यात येणार मदत.....

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी शासनाकडून करण्यात येणार मदत.. – लाभार्थ्यांना मिळणार चार एकर जिरायती अथवा दोन एकर बागायती जमीन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी शासनाकडून मदत करण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना चार एकर जिरायती अथवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.गैर आदिवासी कुटुंबांकडून शेतजमीन खरेदी करण्यासाठी इच्छुक विक्रेत्यांकडून सन २०२५-२६ करिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.ज्या शेतकऱ्यांना आपली चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन विक्री करायची आहे,त्यांनी संबंधित पटवारी(तलाठी) हद्दीनिहाय अर्ज संमती पत्रासह सादर करावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
जमीन विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे👇
जमिनीचा ७/१२ उतारा आणि गाव नमुना ८.
प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
कुटुंबातील सर्व सदस्यांची (पत्नी,मुले,सख्खे भाऊ) जमीन विक्रीसाठी संमती व ना-हरकत प्रमाणपत्र.
क्षेत्रफळाची मोजणी व नकाशासह टाचण अहवाल.
न्यायालयीन वाद नसल्याचे व नुकसान भरपाई न मागण्याचे १०० रुपये स्टॅम्पवर शपथपत्र व हमीपत्र.
जमिनीचे दर प्रचलित शासकीय दरांप्रमाणे किंवा जिल्हास्तरीय समितीद्वारे वाटाघाटीनंतर निश्चित केले जातील.मात्र,प्राप्त प्रस्तावांवरुन जमीन खरेदी करणे हे बंधनकारक असणार नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ असून इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!