उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- मुंबईमध्ये बॉलिवूड स्टार रॉयल स्टाईलने जगतात पण अभिनेता सलमान खान, ऋतिक रोशन,कार्तिक आर्यन,कृती सेनन आणि अनुपम खेर यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रटी देखील स्वतःच्या घरात न राहता भाड्याच्या घरात राहतात. सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहून महिन्याला लाखो रुपये भाडे भरतात.महिन्याला लाखो रुपये भाडे भरण्यापेक्षा सेलिब्रिटी स्वतःच्या घरात का राहत नाही असा प्रश्न देखील अनेकांना पडतो.
सेलिब्रिटी भाड्याने राहतात यामागे देखील मोठे कारण आहे.सेलिब्रिटी महिन्याला लाखो रुपये भाडे भरतात,त्यामध्ये सेलिब्रिटी आरामात वन बीएचके घर घेवूच शकतात.सेलिब्रिटी भाड्याने राहतात म्हणजे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही असे सर्वांना वाटत असले परंतु असे नाही.सलमान खान,ऋतिक रोशन,अनुपम खेर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांकडे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे.
सलमान खान,ऋतिक रोशन,अनुपम खेर हे कलाकार स्वतःचे घर असून देखील महिन्याला जवळपास ५ ते ८ लाख रुपये भाडे भरतात. सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहतात कारण, सेलिब्रिटी शुटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात म्हणून भाड्याच्या घरात राहण्यासाठी सेलिब्रिटींची पसंती असते.ज्यामुळे त्यांना सेटवर जाण्यासाठी उशीर होत नाही.
स्वतःचे घर खरेदी करण्याशिवाय सेलिब्रिटी वेग-वेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात.ज्यामुळे त्यांना फायदा होतो.जर तेच पैसे सेलिब्रिटी घर खरेदी करण्यात लावतील,तर पुढच्या १० ते २० वर्षांमध्ये त्यांना हवा तसा नफा मिळणार देखील नाही. सेलिब्रिटी मुंबईमध्ये स्वतःचे घर घेतात पण त्या घरात त्यांचे कुटुंब राहतात.एवढेच नाही तर, भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे त्यांना टॅक्स पासून देखील सवलत मिळते.सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या घरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.सेलिब्रिटी त्यांच्या घराची सजावट महाड्या वस्तूंनी करीत असतात.मुंबईत अनेक नवीन कलाकार आले आणि स्वतःची स्वप्न पूर्ण केली.काहीचे मुंबईमध्ये भव्य घर आहेत तर काही सेलिब्रिटी भाड्याने राहतात.त्यांचे महिन्याचे भाडे लाखोंमध्ये असते.आपल्याला हवे तसे आयु्ष्य जगता यावे म्हणून देखील सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहतात.