Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांच्या प्रयत्नाने शाळांना संगणक संचाचे वितरण..

ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांच्या प्रयत्नाने शाळांना संगणक संचाचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-तंत्र ज्ञानाच्या युगात संगणकाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.सर्व शासकीय कार्यालय,निम-शासकीय कार्यालय,खासगी संस्था,दुकाने व विविध आस्थापनांमध्ये संगणकाचा वापर करतांना दिसून येतात.अशातच शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकाविषयी माहिती असावी,जेणेकरून भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू नये व योग्यरित्या संगणक हाताळता यावे; यासाठी विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेता ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे देसाईगंज तालुक्याच्या शाळांमध्ये संगणक संच उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार शाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणक संच उपलब्ध करून वितरण करण्यात आल्याने ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मनोज ढोरे यांनी या आधीही देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे आमदार सुधाकर अडबाले यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये किंमतीचे वाचनालय मंजूर करीत नुकतेच वाचनालय इमारत बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे.मनोज ढोरे यांची ओबीसी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधिंच्या सहकार्याने कुरुड-कोंढाळा जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक विकास कामे केली असून आमदार अडबले यांचेकडे केलेल्या मागणीनुसार शाळांना संगणक संच उपलब्ध करून दिल्याने ढोरे यांनी अडबाले यांचे आभार मानले आहे.
संगणक संचामध्ये मॉनिटर,प्रिंटर व इतर साहित्य शाळांना वितरीत करण्यात आले आहेत.यामध्ये देसाईगंज तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड,विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणिक संकुल कोंढाळा,राधेश्याम बाबा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुरुड तसेच श्री तुकाराम विद्यालय कढोली या चार शाळांचा समावेश असुन या चारही शाळांना संगणक संच व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शाळांना संच उपलब्ध करून देण्यात आल्याने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी मनोज ढोरे यांचे आभार व्यक्त केले आहे.संच वितरीत करतांना जिल्हा परिषद हायस्कूल कुरुडचे मुख्याध्यापक वकिल शेख, कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणिक संकुल कोंढाळाचे मुख्याध्यापक देशमुख,सांस्कृतिक विभाग काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मेश्राम, देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,कोंढाळा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  हरिभाऊ पत्रे,शेतकरी नेते श्याम मस्के तसेच शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!