उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलिनेअर इंडेक्सच्या माहितीनुसार, १८७ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसोबत एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत होण्याचे व्यक्ती ठरले आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार,एलन मस्क यांची एकूण संपत्ती १८७.१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.तर बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती १८५.३ इतकी होऊन ते दुसऱ्या स्थानवर घसरले आहेत.गेल्या वर्षी श्रीमंताच्या यादीत एलन मस्क दुसऱ्या स्थानावर होते.मात्र, २०२३ मध्ये एलन मस्क यांना मोठा नफा झाल्याचे दिसून येत आहे.एलन यांना ऑटो कंपनीच्या शेअरमुळे फायदा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षी टेस्लाच्या स्टॉक्समध्ये ९० टक्के वाढ नोंद झाली आहे.तर एलन मस्क यांच्या संपत्ती ३६ टक्के अर्थात ५० अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.त्यामुळे डिसेंबरच्या अखेरपर्यंत मस्क यांची संपत्ती १३७ अब्ज डॉलर इतकी झाली होती.