उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- तालुक्यातीलविहिरगाव येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत पॅनकार्ड,श्रम कार्ड व आरोग्य कार्डचे वाटप अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे हस्ते विहिरगाव ग्रामपंचायत येथे अनेक गोरगरिबांना मोफत वाटप करण्यात आले आहे.
शासकीय योजना,उपक्रमांचे लाभ गोरगरिब, सर्वसामान्य जनतेला व्हावे या उदात्त हेतूने तनुश्रीताई आत्राम अनेक उपक्रम राबवित असतात.शासकीय योजना प्रत्येक गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे; अनेकवेळा शासनाच्या योजना केवळ कागदोत्रीच राहत असतात.सर्वसामान्य जनता व गोरगरीब अनेक योजनांपासून वंचित राहत असल्याने आम्ही सतत काम करत राहू असे;आश्वासन तनुश्रीताई आत्राम यांनी विहीरगाव येथील कार्यक्रम प्रसंगी दिले आहे.कार्यक्रम प्रसंगी विहीरगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेमके,ग्रामपंचायत सदस्य निखिल बारसागडे,गावकरी लाभार्थी व गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.